Ad will apear here
Next
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’


अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला.

पुण्यातील हडपसर येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक या राज्यव्यापी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा एक नोव्हेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या खेळ ज्योतीच्या मशाली, रोषणाई, पुण्यातील १२४ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती हे या उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.

युवा मोर्चाचे आमदार योगेश टिळेकर यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, भाजपचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, जगदीश मुळीक व महापौर मुक्ता टिळक यांचे स्वागत केले.  



फडणवीस म्हणाले, ‘अटल क्रीडा नगरीमध्ये सुरू होत असलेल्या या कार्यक्रमाद्वारे राज्याच्या खेळाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जाईल व महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्रांतीला सुरुवात होईल. पुण्यातून सुरू झालेली क्रीडा क्रांतीची सुरुवात राज्यभरातील नवीन क्रीडा प्रतिभांना घडवण्यासाठी मदत करेल; तसेच युवा पिढीला काँप्युटरच्या खेळांमधून बाहेर काढून मैदानी खेळांकडे आणण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावेल.’

पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प राबविला जात असून, त्यातील एक टप्पा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आता हडपसरपर्यंत धावणार असल्याची घोषणा या वेळी  मुख्यमंत्र्यांनी केली. आमदार टिळेकर यांमी मला हड़पसरसाठी गळ घातली, त्यांना विनंतीला मान देऊन मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्ग घेतल्याचा फडणवीस यांनी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमाला सुमारे १० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले व आकाशात तिरंगी फुगा सोडून मैदानात खेळाडूंमध्ये जाऊन खेळाला सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात सुरू झालेला हा समारंभ १२ जानेवारीपर्यंत चालणार असून, यात राज्यातील विविध जिल्ह्यांतून ५० लाख स्पर्धक सहभागी होणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZYEBU
Similar Posts
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात
पुण्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता पुणे : दिव्य ज्योती परिवार आणि दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या शिष्या आणि भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली
पुणे येथे महा-योजना शिबिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने कोथरूड मतदारसंघातील आयोजित करण्यात आलेल्या महा-योजना शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे येथे लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन पुणे : ‘अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजातर्फे २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाउनशिप येथे महाअधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात होणाऱ्या उद्योजकता संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language